● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷वाटले स्वतःला भेटले आहे 🌷
ओळखीचे दान पदरी घेतले आहे
वाटले की मी स्वतःला भेटले आहे
कुंपणाच्या बाभळींना तोडले आता
झाड चाफ्याचे मनाने वाढले आहे
कैक प्रश्नांची उकल होईल वेळेवर
सोबतीला आठवांना आणले आहे
पेटलेल्या भावनांना शांत केले अन्
या जगाला चांगली मी वाटले आहे
शोध तू सरिता तुझाही वेगळा रस्ता
का तुझे मन फार येथे गुंतले आहे
स्मिता
सरिता प्रशांत गोखले
रत्नागिरी
गझलकारा सरिताजी गोखले यांना
गझलकारा सरिताजी गोखले यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments