Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

तो थांबला तर पाहिजे Gazalkara Priya Kaulwar

 ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹



 🌷तो थांबला तर पाहिजे🌷


हाक मी देईन पण तो थांबला तर पाहिजे

हा दुरावा हा अबोला सोडला तर पाहिजे


भेट नजरेची कदाचित त्यास मी देईन पण

वाचणारा मित्र कोणी भेटला तर पाहिजे 


डेटवर येशील का तू पाच साडेपाचला

मेल केला त्यास मी पण वाचला तर पाहिजे


पुस्तके पडताच खाली प्रेम होते ऐकले

पण कुणाचा एक धक्का लागला तर पाहिजे


ही अशी कळणार नाही वेदनेची सल फुला

या तुझ्या पायात काटा टोचला तर पाहिजे


लागले हाती कुणाच्या काय ते पाहू पुढे

गळ तुम्ही माझ्यात आधी टाकला तर पाहिजे


आतली त्याच्या गढुळता नेमकी  समजायला

तळ प्रिया तू काळजाचा गाठला तर पाहिजे


प्रिया कौलवार ( गझलप्रिया )



 गझलकारा प्रियाजी कौलवार यांना

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..

🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments