● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷जगण्यात राम नाही 🌷
जगण्यात राम नाही शब्दात त्राण नाही
यावर उपाय आता पण रामबाण नाही
झटक्यात सगळ्या शत्रूस नमवणारा
हुकमी इथे कुणाच्या भात्यात बाण नाही
फोफावले किती हे पिक हायब्रीड आता
पण खंत एवढी हे कसदार वाण नाही
धुंदीत या सुखाच्या माणूस पळत सुटतो
हातून काय सुटते कोणास जाण नाही
आईशिवाय इतकी माया कुणी न करते
ती लेकरास म्हणते केव्हाच घाण नाही
प्रेमात फक्त गप्पा करतात मोठमोठ्या
देतो कुणा करीता कोणीच प्राण नाही
डॉ मीना सोसे
लोणार
गझलकारा डॉ मीनाजी सोसे यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=


0 Comments