● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷जोतिबाचा बाळ आहे 🌷
ही चिता इतकी कशी घायाळ आहे
आपल्यांनी लावलेला जाळ आहे
वाचवाया तू कधी जाशील त्याला
अर्धमेला आज देवा टाळ आहे
चळवळीसाठीच जगले पाहिजे मी
रात्र वैऱ्याची, विषारी काळ आहे
माय म्हणते भाकरी वाटून खावी
मायचे काळीज की आभाळ आहे
घुंगरू छातीत माझ्याही चिरकले
हुंदके देतोय कोठे चाळ आहे
होय श्रीमंती खरी इतकीच माझी
बा भिमाशी जोडलेली नाळ आहे
आणखी ओळख हवी माझी कशाला
माय साऊ, जोतिबाचा बाळ आहे
विजय वडवेराव
गझलकार विजयजी वडवेराव यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=


0 Comments