● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷श्वासांचा डुलणारा नाग जणू 🌷
तू शरिराचा, आत्म्याचाही भाग जणू
भोवळलेल्या आयुष्याचा माग जणू
वाजत जाते माझ्या अंगी धून तुझी
श्वास तुझा त्या संगीताचा राग जणू
भग्न जरी हा वाडा माझा त्यात फुले
वावरलेल्या सर्व ठिकाणी बाग जणू
तू दिवसाच्या चैतन्याची सुंदरता
मावळतीच्या सौंदर्याची जाग जणू
भग्न घराच्या खोल्यांच्या हृदयात उरे
आपण केलेल्या प्रेमाची आग जणू
जीवन आहे की स्मरणांचे संचित हे...?
त्यावर श्वासांचा डुलणारा नाग जणू
प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी
लातूर
गझलकार प्रा. डॉ. संतोषजी कुलकर्णी यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=


0 Comments