Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

माणूस माणसाच्या शोधात आहे Gazalkar Vikas Bhave

● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹



 🌷माणूस माणसाच्या शोधात आहे 🌷


माणूस माणसाच्या शोधात आज आहे 

जो तो इथे स्वतःच्या नादात आज आहे 


माझ्याच वेदनांचा आकांत रोज  आहे

कोणी न सावराया दु:खात आज आहे 


खोडून काढले मी आरोप सोय-यांचे

खोटीच याचिकाही वादात आज आहे


साथीस घेतलेला हा पूर भावनांचा 

कापूर वेदनांचा हातात आज आहे 


आता कुठे जरासा मी घेतला विसावा

स्वप्नातल्या सुखाच्या ध्यासात आज आहे


विकास मधुसूदन भावे


 गझलकार विकासजी भावे यांना

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..

🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments