● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷मिठीत एक चांदरात पाहिजे 🌷
यायला मिठीत एक चांदरात पाहिजे
ओढ गारव्यातली तुझ्या उन्हात पाहिजे
वागवा मुली समान... सून आणली घरी
नांदत्या घरात लेक... जर सुखात पाहिजे
रेशमी मिठीत श्वास मंद मंद चालतो
बाहुपाश हा असाच पावसात पाहिजे
वेगवेगळे विचार.. प्रश्न एक आपला
माणसा तुला कशास जातपात पाहिजे
वाटले म्हणून एक मांडला विचार मी
पेटली घराघरात सांजवात पाहिजे
मी इथे नि ती तिथे जरी न भेटलो कधी
राहिली तशीच ती तिथे सुखात पाहिजे
फक्त एवढे मला तुझ्याकडून पाहिजे
सोबतीस तू हवी नि तू घरात पाहिजे
रत्नाकर जोशी
जिंतूर
गझलकार रत्नाकरजी जोशी यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments