● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷दिवे लावू 🌷
सुन्या अंधारवाटेवर दिवे लावू दिवे लावू
नवे गाणे प्रकाशाचे पुन्हा गाऊ दिवे लावू
जुन्या चाली, रितीभाती गड्यांनो तोडुया बेडया
नव्या दुनियेमधे आपण जुने जाळू दिवे लावू
कुण्या विझल्या मनामध्ये नव्याने चेतना फुलवू
अशांच्या ठाम पाठीशी उभे राहू दिवे लावू
पणाला लावले ज्यांनी उभे आयुष्य लढण्याला
तयांच्या शौर्यवेदीवर फुले वाहू दिवे लावू
अनामिक उंबऱ्याने या कितीदा रोखले आम्हा
चला या चौकटीमधुनी पुढे जाऊ दिवे लावू
संजय कुळये
गझलकार संजयजी कुळये यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=


0 Comments