● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷माय जेंव्हा जुनी नोट मोडायची 🌷
तू मला, मी तुला साथ मागायची
वादळातूनही वाट काढायची
अंधश्रद्धा मला सत्य वाटायची
माय जेंव्हा कधी दृष्ट काढायची
काजळा सारखा रंग माझा तरी
माय माझी मला तीट लावायची
कोंडलेल्या व्यथा काढ बाहेर तू
वाट का पाहतो श्वास थांबायची
जर तुला घ्यायची झोप गर्भातली
माउलीसी पुन्हा नाळ जोडायची
बर्फगोळा मला खूप पोळायचा
माय जेंव्हा जुनी नोट मोडायची
तू खलासी खरा जीवनाचा तुझ्या
भोवऱ्यातून तू नाव काढ़ायची
लीनतेला हवी एक परवानगी
या जगाशी खुलेआम भांडायची
रोज स्वप्नामधे यायची जायची
'स्वप्न पाहू नको' हेच सांगायची
शोधताना ससा वाघही भेटतो
साधने ठेव तू त्यास मारायची
.........आत्मा
आत्माराम जाधव
गझलकार आत्मारामजी जाधव यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments