Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

आत्मे मोक्षाकडे निघाले Gazalkar Dr Shivaji Kale

 ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹



 🌷आत्मे मोक्षाकडे निघाले🌷


मेंदूकडून आले, पोटाकडे निघाले

डावे विचार उजव्या ध्येयाकडे निघाले


दुनिया सुधारण्याला येणार कोण खाली

सगळे महान आत्मे मोक्षाकडे निघाले


ज्याच्याविरुद्ध त्यांनी दिवसा उठाव केला

रात्री कळप पुन्हा त्या गोठ्याकडे निघाले


कैद्याकडेच मुक्ती मागायला निघाले

नादान पाय काळ्या डोहाकडे निघाले


मी हे अधांतरी जग सोडायला हवे का ?

बुद्धी म्हणेल का, मन स्वार्थाकडे निघाले


डोळे मिटून रस्ते मी वाचलेत काही

ज्यांना सरळ समजलो ते वाकडे निघाले


सुनसान या तळावर नांगर फिरव शिवा तू

तांडे उठून पुढच्या गावाकडे निघाले


डॉ. शिवाजी काळे


 गझलकार डॉ. शिवाजी काळे सर यांना

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..

🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments