Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

व्यवहारिक नाही Gazalkar Dr Pawan Korde

 ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹



 🌷व्यवहारिक नाही 🌷


मगरी-अश्रूवर रडणे व्यवहारिक नाही

इतके कनवाळू असणे व्यवहारिक नाही


ज्या झाडाची सलगी कडकडत्या बिजलीशी 

त्या झाडाखाली निजणे व्यवहारिक नाही


खोट्या कपटी कौरवांसोबत पांडवांनी 

चौसर खेळाया बसणे व्यवहारिक नाही 


बुरख्याने ना नजर झाकली प्रकरण घडले

नजरेला दोषी म्हणणे व्यवहारिक नाही 


मैत्री ही निभवावी मोजायाची नाही

मैत्री व्यवसायिक बनणे व्यवहारिक नाही 


या दु:खावर माझ्या तू तर रडला नाही 

इतके व्यवहारिक ठरणे व्यवहारिक नाही


त्यांच्या हृदयामधुनी अश्रू वाहत असता

तुमचे डोळयांनी हसणे व्यवहारिक नाही 


ओळख व्हावी अपुली अपुल्या सत्कर्माने

दुष्कर्माने ओळखणे व्यवहारिक नाही  


जर ना बुद्धीमध्ये बळ ना दृष्टित वादळ 

तर स्वप्नांमागे पळणे व्यवहारिक नाही 


खैरातीची किंमत नाही परवडणारी

हे खैरातीवर जगणे व्यवहारिक नाही 


या ठरलेल्या वेळी भेटू म्हटल्यानंतर 

वेळेवर ना पोहचणे व्यवहारिक नाही


या गझलेच्या सुंदर संमेलनात तू रे

ही चारोळी ऐकवणे व्यवहारिक नाही


डॉ. पवन कोरडे


 गझलकार डॉ. पवनजी कोरडे यांना

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..

🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments