● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷इगोवर नम्रपणाचे शिंपड अत्तर🌷
मला म्हणाला, नक्की भेटू, वेळ सांगतो नंतर.”
मीही अख्खा जन्म काढला या नुसत्या आशेवर
विचारात गुरफटतो नाहक.. हरवुन जातो नंतर
चक्रव्यूहपण असेल सोपे.. मन त्याहून भयंकर
आठवणींच्या आवेगातुन वेचत असते ओळी
आणि जिवाची तगमग तगमग सांडत बसते मनभर
नकोच सांगू काहीसुद्धा जीव कशाने जळला
सारे काही क्षणात कळते तुला बघितल्यानंतर
वडील गेले, मुलगा गेला नवरा सुध्दा गेला
कसे म्हणू सांभाळ स्वतःला कसे म्हणू तू सावर
नात्यांमधली घालमेल तर चुटकीसरशी विझली
जेव्हा केले आयुष्याला मीच तुझ्या नावावर
भांडण चर्चा वादावादी या आधी ना घडले
प्रेम जराही नसेल उरले मन भेदाच्या नंतर
ऊन प्रखर गर्वाचे झाले.. सुकून गेली नाती
तुझ्या इगोवर नम्रपणाचे शिंपड थोडे अत्तर
सुप्रिया पुरोहित हळबे
ठाणे
गझलकारा सुप्रियाजी पुरोहित हळबे यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=


0 Comments