● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷प्रस्थान🌷
झाले जरी नकोसे, ना टाळुनी निघालो
त्या कागदी फुलांना गंधाळुनी निघालो
जग लाडक्या सुखांना मारीत हाक होते
सा-या जुन्या व्यथा मी चोंभाळुनी निघालो
निबरट परिस्थितीची व्हावी कशी मिमांसा ?
संदर्भ ' कोवळा' तो जर गाळुनी निघालो...
प्रत्येक जीव म्हणजे माझाच जीव आहे -
समजून आरसा मी न्याहाळुनी निघालो!
मतभेद, क्रोध वितळो; या पेटवू अहंता
राष्ट्रीय एकतेस्तव ' मी' झाळुनी निघालो !
हेमंत म. डांगे
गझलकार हेमंतजी डांगे यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments