Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

रस्ते Gazalkara Archana Deodhar

● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹



 🌷रस्ते..🌷


श्वापदांनी माणसांचे वेढले रस्ते

माणसांनी  सोडले का आपले  रस्ते?


वाढले ओझे किती आता अपेक्षांचे

लोभमोहाच्या दिशेवर भाळले रस्ते


वेदनांचा दाह सोसत चालली आई

लेकरांसाठी सुखाचे बांधले रस्ते


स्वार्थसाधू माणसांची वाढली गर्दी

होउनी हतबल किती ओशाळले रस्ते


वाममार्गांचीच आता वाढली चलती

मानले आदर्श ते मागासले रस्ते


ऊन अन्यायातले नाही सहन झाले

सोसुनी साऱ्या झळा हे पोळले रस्ते


अर्चना गेलीस तू काट्यांतुनी आधी

मग फुलांमधुनी तुझे गंधाळले रस्ते


अर्चना देवधर

रत्नागिरी



 गझलकारा अर्चनाजी देवधर यांना

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..

🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=



Post a Comment

0 Comments