Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

सोपे नसे हे काम रे Gazalkar Vinod Devarkar

 ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹



 🌷सोपे नसे हे काम रे🌷


सोपे जरी हे वाटते, सोपे नसे हे काम रे !

आसक्त या देहामधे शोधू कसा मी राम रे?


स्त्रीलाच त्या तू छेडतो; जी दर्शना आली असे..

‘मी संत आहे‘ सांगुनी, झाला कसा बेफाम रे?


फासून घेती रंग ते.. झेंडे स्वतः धर्मांध जे!

का एक फडकू लागता दूजास झंडू बाम रे?


गेलो कधी ना कोणत्या वारीमधे ना राउळी..

मग विठ्ठला आले कसे, ओठावरी तव नाम रे?


त्यालाच मिळते नोकरी जो दानपात्री टाकतो..

पंख्यास लटके तो युवा ज्याच्याकडे ना दाम रे!


संसद, असो की मंदिरे.. भक्ता प्रसादाचे पुडे.. 

हो! लागतो हल्ली म्हणे, दोन्हीकडेही जाम रे!


पानाफुलांतूनी कधी तर दीनदुबळ्यांच्या घरी..

हे! ईश्वरा तू भेटला.. सोडून चारी धाम रे !


विनोद देवरकर


 गझलकार विनोदजी देवरकर यांना

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..

🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments