Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

सूर्यास जाग आली Gazalkara Sangita Mane

 ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹



 🌷सूर्यास जाग आली🌷


झाले दिगंत गोचर हसरी प्रभात झाली

तम पांघरून निजल्या सूर्यास जाग आली


 निमिषात सर्व झाले आकाश मोकळे ते 

त्या चंद्र तारकांना मुक्ती झणी मिळाली


पात्यावरी दवांचे दैदिप्यमान मोती

दुलईत त्या धुक्याच्या धरती खुशाल न्हाली


 मग किलबिलाट झाला केका दुरून आला

अवघ्या चराचरावर हिरव्या बहार शाली


 घेवून लक्ष किरणे क्षितिजावरी उगवला

तो सूर्य सावल्यांना अपुल्या कवेत घाली


 तो मंद मंद वारा अवघाच खेळ न्यारा

स्पर्शून केशभारा खुलवी खळीस गाली


नटला निसर्ग तैसा आरोग्य ही नटावे

करण्या जतन वनांचे व्हावा मनुष्य वाली


सौ संगीता माने


 गझलकारा सौ संगीता माने यांना

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..

🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments