Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

घडवू बघते Gazalkara Suvarna Mulajkar

● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹



 🌷घडवू बघते🌷


ऊन्ह प्राशुनी पळस मनाचा फुलवू बघते

भर सांजेला कमळदेह हा मिटवू बघते


ऋतुचक्राच्या चाकोरीचे गीत अलौकिक 

सुरात त्याच्या सूर स्वतःचा मिळवू बघते


साधी घेते कल्पकता अन्  प्रतिभा थोडी

चराचरी दडलेली कविता घडवू बघते 


भेसळ इतकी शुद्ध स्नेह तो कसा मिळावा

विचार घुसळुन नवनीताला कढवू बघते


काळ अचानक झडप घालतो माहित आहे 

क्षणक्षण जगुनी आयुष्याला नटवू बघते


पंख जखडले होते बुद्धी कुंठित झाली 

घेत भरारी नभात मजला उभवू बघते


माय मराठी हृदयामध्ये वाहत आहे

आर्त मनाने तिच्यात मजला भिजवू बघते


सौ. सुवर्णा व्यंकट मुळजकर

परभणी.

9404738040

svmulajkar111@gmail.com


 गझलकारा सुवर्णाजी मुळजकर यांना

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..

🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=



Post a Comment

0 Comments