● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷सूर्य मनाशी रडत राहतो🌷
अंधाराला कवेत घेता दिवा एकटा जळत राहतो
देव पाहतो सत्व दिव्याचे...सूर्य मनाशी रडत राहतो
शीतल रुपडे, डाग कशाचा त्याचे त्याला कळतच नाही
आरशात मग स्वतःस बघता चंद्र एकटा कुढत राहतो
घाव घातला शब्दांचा अन् कुरवाळलेस तू प्रेमाने
तरी शेवटी मनात काटा जखमेचा का सलत राहतो
म्हणता म्हणता 'तो' सूत पुत्र ..त्यास जगाने किती हिणवले
मरणांतीही कर्ण बिचारा घाव आपला भरत राहतो
जात कुळावर अडता शिक्षण न्याय कोणता कुठे वाहतो
अपमानाच्या झेलत जखमा एकलव्य मग घडत राहतो
कोणी नसता आपुलकीचे भीत राहते ती जगताना
म्हातारीचे जगणे म्हणजे सतत भोपळा पळत राहतो
सोपे नसते तळहाताच्या रेषा साऱ्या मोजत बसणे
प्रारब्धाचा आस भोवती मानव त्यातच फिरत राहतो
सौ मृणाल सुनिल गिते
गझलकारा सौ मृणालजी गिते यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments