● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹



 🌷सत्य 🌷


दुःख आहे जगात या;

सत्य हे जीवनात या. 


कोण मेले घराजवळ?

वाचले पेपरात या. 


माणसे भेटती अता;

मानवी मुखवट्यात या. 


आठवण जाळते तुझी;

मज सदा पावसात या. 


स्वप्न अन् रक्त पेरतो;

आजही वावरात या...! 


मिलिंद हिवराळे

बार्शिटाकळी, जि. अकोला

भ्र. ७५०७०९४८८२


 गझलकार मिलिंदजी हिवराळे यांना

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..

🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=