● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷पहारा बंद दारांचा🌷
खुल्या आहेत खिडक्या पण पहारा बंद दारांचा...
करावा लागला छोटा तिला आकार पंखांचा..
पुन्हा मागायची नाही गुलाबी जन्म ती, कारण..
मिळाला जन्मभर केवळ तिला सहवास काट्यांचा...
जगाला माहिती आहे तिच्या केसातला गजरा...
जगाला माहिती नाही तिच्या तो जाच केसांचा...
घराने कौतुकें केली तिच्या शालीनतेची पण..
कुणीही ऐकला नाही तिच्या आवाज मौनांचा
तुझा सांभाळ तू बाई, सरकता काठ पदराचा..
कुणीही राहिला नाही इथे निष्पाप डोळ्यांचा...
रडाया लागली सनई बडवला ऊर ताशाने...
कुणाचे लग्न झाले अन् कुणाच्या अंत स्वप्नांचा....
आत्तम गेंदे
गझलकार आत्तमजी गेंदे यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments