● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷माहीत नाही 🌷
वाद हा घडला कशाहुन नेमका माहीत नाही
अन जमा झाला कसा हा घोळका माहीत नाही
लागली असणार बहुदा वाटते काळी अमावस
लुप्त झाल्या आज कोठे तारका माहीत नाही
मी जरी माणूस वरवर चांगला दिसतो जगाला
पण किती आतून आहे फाटका माहीत नाही
एवढे माझ्या हिताचे भोवताली लोक असुनी
का समजतो मी स्वतःला पोरका माहीत नाही
पाहुनी आळस तुझा हा जग उद्या लागेल बोलू
की तुला व्यवहार सुद्धा मोजका माहीत नाही
मी जरासा सावराया लागलो होतो अशातच
दाटुनी आला कुणाचा हुंदका माहीत नाही
गिरीष खोब्रागडे
ब्राम्हणवाडा (पूर्व )
ता. नेर, जि. यवतमाळ
संपर्क : 8263912741
गझलकार गिरीषजी खोब्रागडे यांना
वाढदिवसाच्या मंगलमय गिरीष शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments