Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

मी जगाचा भरवसा सांभाळला Gazalkar Maroti Manemod

 ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹


 🌷मी जगाचा भरवसा सांभाळला🌷


जवळ फुटका आरसा सांभाळला

मी जसा तुटलो,तसा सांभाळला!


गरज होती विस्तवाची शेवटी

ओंजळीतच कोळसा सांभाळला


याद आली की तुझी घोटाळतो

काळ प्रेमाचा असा सांभाळला


जाहलो विस्तीर्ण कारण की तुझ्या 

मी वडाचा वारसा सांभाळला


संपल्या प्रेमातल्या खाणाखुणा 

का तरी ओठी ठसा सांभाळला


मोडता येणार नाही यार हो

मी जगाचा भरवसा सांभाळला


मी व्यथा सांभाळली गर्भातली

मी जुना माझा वसा सांभाळला


मारोती मानेमोड



 गझलकार मा. मारोतीजी मानेमोड यांना

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..

🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments