Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

मी तुला आवडू लागले Gazalkara Jaya Nere

 ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹



 🌷मी तुला आवडू लागले🌷


तू मला मी तुला आवडू लागले

का तरीही तुला मी नडू लागले


माय बापात मी पाहिली पंढरी

पांडुरंगा घरी मी घडू लागले


स्वैर व्हावे असे वाटले कैकदा

पण कुठे स्वैर मी बागडू लागले?


वाढले बहरले मी तुझ्या संगती

पण विरह यातनांनी झडू लागले


साचले, गोठले जर मनाचे थवे

आतल्या आत मी बडबडू लागले


सौ. जया नेरे

9423918363



 गझलकारा जयाजी नेरे यांना

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..

🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments