● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷कितीदा मौन झालो मी..🌷
कितीदा मौन झालो मी अता बोलायचे आहे
मनाच्या आतले काही तुला सांगायचे आहे
तुझ्या वाचून जग सारे नकोसे वाटते मजला
मिठी मध्ये तुझ्या आता मला संपायचे आहे
तुझ्या ह्या रेशमी केसात मन हे गुंतले माझे
नभीच्या तारकांना त्या मला माळायचे आहे
तुझ्यावाचून मजला स्वर्ग ही वाटे फिका आता
सुखाचे सोहळे मजला अता पाहायचे आहे
नको ठेऊस माती वर तुझी ही पावले राणी
तुझ्यासाठी गुलाबांचे सडे टाकायचे आहे
नको मारूस नयनांचे जिव्हारी बाण तू मजला
मनाच्या मंदिरामध्ये तुला ठेवायचे आहे
कितीदा जिंकलो मी खेळ हा नखरेल प्रीतीचा
तुझ्या प्रेमात पण आता मला हारायचे आहे
देवेंद्र जोशी
यवतमाळ
गझलकार देवेंद्रजी जोशी यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments