● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷हेही असेच होते🌷
हेही असेच होते, तेही असेच होते
समजून वाघ भ्यालो, तेही ससेच होते
फिर्याद काय देऊ,घडला गुन्हा समोरच
तक्रार मांडली तर माझे हसेच होते
सत्यास न्याय देतो, कोणी इथे सुखाने
न्यायास रोखणारे, भरले खिसेच होते
मोहात चांदण्यांच्या, संपूर्ण रात्र गेली
सरताच कैफ दिसले, उरले ठसेच होते
सारेच मग्न होते, पत्रावळीत अपुल्या
दुष्काळ भोगणारे, उरले तसेच होते
सचिन इनामदार
गझलकार सचिनजी इनामदार यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments