Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

सुन्या रस्त्यात होतो मी Gazalkar Mahesh Honmane

          ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹



 🌷सुन्या रस्त्यात होतो मी🌷


सुन्या रस्त्यात होतो मी, जसा बेकारसा पत्थर

मला स्पर्शून गेली तू, तसा मी जाहलो ईश्वर


मनाचे घर सजवले तू, जरी दुसऱ्याच नावाने

घरावर नाव त्याचे, पण जमीन माझ्याच नावावर 


कशी मारुनही सोबत, उडी विहिरीत प्रेमाच्या

कसा गाळात रुतलो मी, कशी तू राहिली वरवर


तुझ्या साजूक बांध्याचा, किती नाजूक हा नखरा

कुणीही जीव देईल बघ, तुझ्या एका इशाऱ्यावर


किनाऱ्याची गरज नसते, घराची ही गरज नसते

असे बोलत तुफानाला, दिले सोडून वाऱ्यावर


महेश ज्ञानोबा होनमाने

परभणी



 गझलकार महेशजी होनमाने यांना

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..

🌹🌹🌹🌹🌹



=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments